ठाणे शहराचा पाणी पुरवठा उद्या सकाळपासून २४ तास बंद

ठाणे शहराचा पाणी पुरवठा बुधवारी २४ तास बंद राहणार आहे. पाणी पुरवठयाचे नियोजन करण्‍यासाठी  ठाणे महापालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणी पुरवठा बुधवारी म्हणजे 14 नोव्‍हेंबरला सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार 15 नोव्‍हेंबर सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून ठाणे शहरात टप्याटप्याने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये बुधवारी सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, गांधीनगर इत्‍यादी परिसराचा पाणी पुरवठा बंद राहील. तसेच  समतानगर, ऋतुपार्क, सिध्देश्वर, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, मुंब्रा-कोळीवाडा, शैलेशनगर, संजयनगर या परिसरात बुधवार रात्री ९ वाजल्यापासून गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading