ठाणे वेल्फेअर सोसायटीच्या वतीने महापालीकेसमोर करमाफी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन

ठाणे वेल्फेअर सोसायटीच्या वतीने महापालीकेसमोर करमाफी देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. सत्ताधारी शिवसेनेनं २०१७ च्या निवडणुकीत ५०० चौरस फुटाच्या घरांना करमाफी देण्याचे आश्वासन दिलं होतं. मात्र नंतर या आश्वासनाचा शिवसेनेला विसर पडला. निवडणुकीतील आश्वासनाप्रमाणे ही करमाफी मिळावी या मागणीसाठी ठाणे वेल्फेअर सोसायटी या सामाजिक संस्थेच्या वतीने यावेळी आंदोलन करण्यात आलं. अल्पेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हातात बॅनर घेऊन 20 ते 25 ठाणेकरांनी हे आंदोलन केले. लवकरात लवकर ठाणेकरांना ही करमाफी लागू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading