ठाणे वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरिक्षकास ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना अटक

ठाणे वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरिक्षक आत्माराम पाटील यांना ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. या प्रकरणातील तक्रारदारांच्या कंपनीच्या ओडीसी वाहनास पोलीस उपायुक्त कार्यालयाचे ना-हरकत प्रमाणपत्र हवे होते. हे प्रमाणपत्र देण्याकरिता पोलीस उपनिरिक्षक आत्माराम पाटील यांनी तक्रारदारांकडे ८ हजारांची मागणी केली होती. शेवटी तडजोडीअंती ५ हजार रूपये देण्याचं ठरलं. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर उपनिरिक्षक पाटील यांना तक्रारदारांकडून ५ हजार रूपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलं. आत्माराम पाटील हे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात काम करत होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading