ठाणे वाहतूक शाखेची कर्णकर्कश्श आवाज करणा-या दुचाकी आणि काळ्या काचा असणा-या चार चाकी वाहनांवर कारवाई

ठाणे वाहतूक शाखेनं कर्णकर्कश्श आवाज करणा-या दुचाकी आणि काळ्या काचा असणा-या चार चाकी वाहनांवर कारवाई केली आहे. ठाणे वाहतूक शाखेनं गेले चार दिवस राबवलेल्या मोहिमेत कर्णकर्कश्श आवाज करणा-या १९० दुचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई केली असून १२१ दुचाकींचे मॉडीफाय केलेले सायलेन्सर काढून नष्ट केले आहेत. तर ४८४ चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ४०४ चारचाकी वाहनांच्या काळ्या फिल्म काढून टाकल्या आहेत. चारचाकी वाहनांना असलेल्या काळ्या फिल्म्समुळे गुन्हेगारी स्वरूपाच्या गोष्टी घडण्याच्या शक्यता असतात. पोलीस नाकाबंदीमध्ये तपासणी करताना अशाप्रकारच्या वाहनांमुळे अडथळा निर्माण होतो. तर वाहनांच्या मूळ ठेवणीमध्ये बदल करून कर्णकर्कश्श आवाज करणा-या दुचाकींमुळे नागरिकांना त्रास होतो. यासाठी वाहतूक शाखेतर्फे कर्णकर्कश्श आवाज करणारे सायलेन्सर आणि काळ्या काचा काढण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मात्र तरीही काही होत नसल्यामुळे १४ ते १७ जून दरम्यान वाहतूक शाखेच्या १८ वाहतूक उपविभागामार्फत ही कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे कर्णकर्कश्श आवाज करणारे सायलेन्सर काढून ते रोडरोलर खाली नष्ट करण्यात आले. कर्णकर्कश्श आवाज करणा-या वाहनांचे सायलेन्सर आणि काळ्या काचांचा वापर तात्काळ बंद करावा असं आवाहन वाहतूक शाखेतर्फे करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading