ठाण्यामध्ये गेल्या २४ तासात १८९ मिलीमीटर पाऊस

ठाण्यामध्ये गेल्या २४ तासात १८९ मिलीमीटर पाऊस झाला आहे. काल दुपारपासून झालेल्या या जोरदार पावसामुळे ठाणे जलमय झालं होतं. शहरामध्ये जवळपास १२ हून अधिक ठिकाणी पावसाचं पाणी साचल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी अनुभवायला येत होती. गुडघाभर पाण्यातून वाहन चालक वाहनं काढत असल्यामुळे काही वाहनं बंद पडत होती. बंद पडलेल्या या वाहनांमुळे या वाहतूक कोंडीत भर पडत होती. ठाणे रेल्वे स्थानकातही मोठ्या प्रमाणावर पाणी होतं. रेल्वे सेवा अतिशय धिम्या गतीनं चालू होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading