ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे ४ लाख १२ हजार १४५ इतक्या विक्रमी मताधिक्क्याने विजयी

ठाणे लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे राजन विचारे हे ४ लाख १२ हजार १४५ इतक्या विक्रमी मताधिक्क्याने निवडून आले आहेत. काल झालेल्या मतमोजणीत राजन विचारे यांना ७ लाख ४० हजार ९६९ मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांना ३ लाख २८ हजार ८२४ मतं मिळाली. तर वंचित आघाडीच्या मल्लिकार्जुन पुजारी यांना ४७ हजार ४३२ मतं पडली. ठाणे लोकसभा मतदारसंघात यापैकी कोणीही नाही म्हणजे नोटाचा पर्याय २० हजार ४२६ मतदारांनी वापरला. वस्तुत: राजन विचारे यांच्याबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी असतानाही राजन विचारे यांना पडलेली मतं लक्षणीय आहेत. विचारे यांनी सुध्दा इतकी मतं मिळतील असा विचार केला नसावा. रात्री उशिरा राजन विचारे यांना विजयी घोषित करण्यात आलं. या मतदारसंघात झालेल्या एकूण मतदानापैकी ६३ टक्के मतं राजन विचारे यांना मिळाली आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading