ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या मालमत्तेत मोठी वाढ

ठाणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या संपत्तीत दुप्पट-तिप्पट वाढ झाल्याचं दिसत आहे. शिवसेनेतर्फे राजन विचारे यांनी तर राष्ट्रवादीतर्फे आनंद परांजपे यांनी काल ठाणे लोकसभा मतदारसंघातून आपापली नामनिर्देशन पत्रं दाखल केली. नामनिर्देशन पत्रं दाखल करताना जाहीर केलेल्या संपत्तीवरून या दोघांच्या मालमत्तेत मोठी वाढ झाल्याचं दिसत आहे. राजन विचारे यांच्या संपत्तीत दुप्पटीनं तर आनंद परांजपे यांच्या संपत्तीत तिप्पटीनं वाढ झाल्याचं दिसत आहे. राजन विचारे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे ११ कोटी ८५ लाखांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्याकडे फोर्ड इन्डिवेअर, मर्सिडीज बेन्झ, फॉर्च्युनर अशा गाड्या आहेत. आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर सुमारे १२ कोटी स्थावर मालमत्ता आहे.त्यांच्याकडेही पाजेरो, मर्सिडीज आणि ऑडी सारख्या गाड्या आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading