ठाणे रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत

कोकण वासियांसाठी वरदान ठरणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षात आणले. ही गोवा-मुंबई पहिली वंदे भारत एक्सप्रेस मंगळवारी रात्री ठाणे रेल्वे स्थानकावर येताच भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या माजी नगरसेवकासह शेकडो कार्यकर्त्यांनी ढोल ताशे वाजवून फेर धरत या एक्सप्रेसचे स्वागत केले. तसेच वंदे भारत एक्स्प्रेसवर पुष्पवर्षाव करून निरंजन डावखरे आणि राजन विचारे यांनी मोटरमनच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून रविंद्र चव्हाण, विनायक राऊत यांच्यासह उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ आणि मिष्टान्न देऊन स्वागत केले. यावेळी भाजप व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणांची जुगलबंदी चांगलीच रंगली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading