ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांच्या भेडसावणाऱ्या समस्या मध्य रेल्वे प्रबंधकच्या पाहणी दौऱ्यात निदर्शनास – खासदार राजन विचारे

ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी आज मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक गोयल तसेच रेल्वेचे सर्व संबंधित अधिकारी आणि ठाणे महापालिकेचे अधिकारी यांच्यासोबत आज संपूर्ण ठाणे रेल्वे स्थानकाचा पहाणी दौरा आयोजित केला होता. या पाहणी दौऱ्या पूर्वी खासदार राजन विचारे यांनी फलाट क्रमांक १ शेजारी असणाऱ्या रेल्वे हॉलमध्ये सर्व अधिकार्‍यांची बैठक घेऊन समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच धोकादायक इमारतीचे काम पाडण्याचे काम सुरू आहे. या जागेवर अत्याधुनिक इमारत उभी राहावी यासाठी सुप्रसिद्ध आर्किटेक हितेन सेठी असोशियन यांच्यामार्फत या ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकाचा आराखडा त्यांनी बनवला होता त्याचे सादरीकरण करण्यात आले. ठाणे रेल्वे स्थानकाचा इतिहासाप्रमाणे याचा आराखडा बनविण्यात आलेला आहे. परंतु या इमारतीसाठी लागणारा निधी रेल्वे मंत्रालयाकडून मंजूर करून घेण्याची जबाबदारी राजन विचारे यांनी घेतली आहे. विचारे यांनी या बैठकीत पार्किंग प्लाझाचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले आहे. रेल्वे प्रशासन फेब्रुवारी अखेरपर्यंत उर्वरित काम पूर्ण करणार आहे. महापालिकेने ठाणे रेल्वे स्थानकात मुंबई कल्याण दिशेस पादचारी पुलासाठी निधी उपलब्ध करून दिलेल्या पादचारी पुलाचे कामही ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले आहे. ठाणे कोपरी पूर्व सॅटिस प्रकल्प आवश्यक लागणाऱ्या परवानगी रेल्वेने महापालिकेला दिली असल्याचे निदर्शनास आणून दिले. ठाणे-वाशी हर्बल मार्गावरील फेऱ्या मधील वाढ तसेच ऐरोली एलिव्हेटेड या मार्गातील दिघा रेल्वे स्थानकाचे काम ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन एम आर व्ही सी चे प्रोजेक्ट मॅनेजर यांनी दिले आहे. त्यामध्ये सरकते जिने आणि लिफ्टची सुविधा ठेवण्याच्या सूचना विचारे यांनी दिल्या आहेत. मध्य रेल्वे मार्गावरील फेऱ्या वाढविण्यासाठी एम आर व्ही सी मार्फत सुरू असलेल्या पाचव्या-सहाव्या लाईनचे काम पूर्णत्वास आलेले आहे. त्यापैकी पाचव्या लाईनचे काम पूर्ण झालेले आहे. सहाव्या लाईनचे काम पूर्ण करण्यासाठी शुक्रवार रात्री पासून रविवार सकाळपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी महापालिकेला अत्यावश्यक बसेस सुरु करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. आज या सिग्नल रूमची पाहणी खासदार राजन विचारे यांनी आज रेल्वे प्रशासनासोबत केली. येत्या ७ फेब्रुवारी पर्यंत या लाईनचे का पूर्ण करून या नवीन रेल्वे लाईन वरून रेल्वे धावणार आहे. राजन विचारे यांनी रेल्वे स्थानकात शौचालयाची कमतरता रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे प्रवाशांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. जास्त करून ५ व ६ नंबर फलाटावरील लांब पल्ल्याच्या गाड्या जे थांबले जाते त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी शौचालयांची उभारणी करावी अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. रेल्वे प्रशासनाने जागा निश्चित करून त्या ठिकाणी नवीन शौचालय उभे करण्याचे रेल्वे प्रशासनाने अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. तसेच खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रवाशांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात बंद पडलेल्या वॉटर वेडिंग मशीन सुरू करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिलेल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने याची निविदा प्रक्रिया होताच सर्व वॉटर वेडिंग मशीन सुरू करणार आहे असे सांगण्यात आले आहे. तसेच खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रशासनाला ठाणे महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा योग्य रीतीने होत आहे परंतु रेल्वेच्या जुन्या लाईन तपासून बदलून घेण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. रेल्वे स्थानकात वारंवार बंद पडणाऱ्या सरकते जिने आणि लिफ्ट याची निगा देखभाल व्यवस्थित रित्या करण्यासाठी यंत्रणा सक्षम करावी तसेच सीसीटीव्ही वाढ करावी. ठाणे रेल्वे स्थानकात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एकही भिकारी स्थानक परिसरात नसावा. तसेच ठेका दिलेल्या ठाणे रेल्वे स्थानकाच्या साफसफाईचे काम दोन टप्प्यात म्हणजे रात्री पूर्ण करावे अशा सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या. ठाणे रेल्वे स्थानकात होणारे गैरप्रकार यांची तक्रार नोंदविण्यासाठी जी आर पी आणि आरपीएफ पोलीस स्थानक लांब असल्याने ठाणे स्थानकात प्रवाशांना तत्पर सेवेसाठी चौकी बसविण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिलेले आहेत. त्याची जागा लवकरच निश्चित करुन येथे चौकी बसविण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ठाणे रेल्वे स्थानकात महिलांच्या डब्यात पोलिस बंदोबस्त आणि सी सी टी व्ही वाढवावे तसेच स्थानकात फेरीवाल्यांचे बस्तान मांडून न देण्याचे आदेश जी आर पी, आरपीएफ पोलिसांना दिले आहे. ठाणे रेल्वे स्थानकात इंटरनेटची सुविधा मोफत असल्याने तासन तास मुले मुली स्थानक परिसरात बसून छेडछाडीचे प्रमाण अधिक वाढले आहे. याकडे लोहमार्ग पोलिसांनी विशेष लक्ष देऊन टाईमपास करणाऱ्या मुला मुलीना स्थानकाच्या बाहेरचा रस्ता दाखवावा अशा सूचना खासदार राजन विचारे यांनी या बैठकीमध्ये केले आहेत. नुकताच मध्य रेल्वेकडून रेल्वे रुळाला लगत असणाऱ्या झोपड्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या यासंदर्भात नौपाडा बी केबिन येथील ५५ रहिवाशांनी खासदार राजन विचारे यांची भेट घेतली होती. आज या पाहणी दौऱ्यात मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक आले असताना त्यांना नागरिकांच्या वतीने पत्र दिले आहे. या पत्रात हे नागरिक इसवी सन १९६७ पासून येथील रहिवासी आहेत ते ठाणे महानगरपालिकेचा नियमित मालमत्ता कर, पाणी बिल, विद्युत बिल भरत आहेत. त्यामुळे या नागरिकांचे जोपर्यंत यांचे पुनर्वसन करत नाही तोपर्यंत त्यांची राहते घरे निष्कासित होता कामा नये असे या पत्रामध्ये असेही म्हटले आहे. खासदार राजन विचारे यांनी उपस्थित असलेल्या रहिवाश्यांना घाबरण्याचे कारण नाही शिवसेना आपल्या पाठीशी ठाम आहे असा त्यांना दिलासा दिला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading