ठाणे – मुंबईच्या पाणी पुरवठा कपातीस जवाबदार असलेल्या स्क्वेअर फिट रिअल ईस्टेट कंपनिच्या विरोधात गुन्हा दाखल

ठाणे आणि मुंबईच्या पाणी पुरवठा कपातीस जवाबदार असलेल्या स्क्वेअर फिट रिअल ईस्टेट या कंपनिच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कंपनी किसन नगर मध्ये बांधकाम करत असून कुप नलिका खेादताना मुंबई महापालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या बोगद्यास भगदाड पडल होतं. नोव्हेंबर मध्ये हा प्रकार घडला होता. या घटने नंतर तब्बल ५ महिन्या नंतर या प्रकरणी  गुन्हा दाखल झाला आहे. या कंपनीचे सचिन विराणी, नविन सावला, मनसुख शहा, धवल सावला, दिपक जैन, वेध मंगला, रमेश शहा आणि गणपतराज जैन असे ८ जण या कंपनीचे भागीदार आहेत. भारतीय दंड सहिंतेच्या कलम ४३० खाली गुन्हा नोंदवलेला आहे. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, माहीती न घेता काम करणं तसेच पाणी पुरवठ्याला नुकसान या अंतरगत हा गुन्हा दाखल झाल्याचं सांगीतलं जातं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading