ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन

कबड्डी हा महाराष्ट्रातील खेळ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला असून या खेळाला प्रोत्साहन देऊन नवे खेळाडू घडवण्याचं आणि या खेळाची परंपरा जोपासण्याचं काम ठाणे महापालिका करत असल्याचं महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं.ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन महापौरांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय पुरूष व्यावसायिक आणि राज्यस्तरीय महिला व्यावसायिक संघात सामने रंगणार आहेत. पुरूष व्यावसायिक आणि महिला गटात प्रत्येकी १८ संघ सहभागी झाले आहेत. उद्घाटनाची लढत ठाणे महापालिका आणि अनुष्का ट्रॅव्हल्स यांच्यात झाली. यामध्ये ठाणे महापालिकेनं बाजी मारली. कबड्डीचा हा थरार येत्या रविवारपर्यंत रंगणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading