ठाणे महापौर चषक व्हॉलीबॉल स्पर्धेत द्रोणाचार्य स्पोर्टस् ॲकॅडमी आणि शमिका किचन्स अजिंक्य

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या ठाणे महापौर चषक व्हॉलीबॉल स्पर्धेत द्रोणाचार्य स्पोर्टस् ॲकॅडमी आणि शमिका किचन्स हे संघ अजिंक्य ठरले. या स्पर्धेत ६२ पुरूष संघांनी तर २२ महिला संघांनी सहभाग घेतला होता. १८ वर्ष वयोगटात द्रोणाचार्य संघ विजेता ठरला. द्रोणाचार्य संघाच्या ध्रुव शेलार, किराट थोरात आणि अजिंक्य हजारे या खेळाडूंनी वैयक्तीक पारितोषिकं पटकावली. १८ वर्षाखालील मुलींच्या गटात जे के सिंघानिया, ४० वर्षाखालील गटात आर बी प्रिन्टर्स, ठाणे विभाग गटात मारूती हार्डवेअर तर ठाणे विभाग महिला गटात सारा एन्टरप्रायझेसचा संघ विजेता ठरला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading