ठाणे महापौर चषक भजन स्पर्धेत मुरबाडच्या जय हनुमान प्रासादिक मंडळाला 20 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक

ठाणे महापौर चषक भजन स्पर्धेत मुरबाडच्या जय हनुमान प्रासादिक मंडळानं 20 हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. तरुणाईला डीजे चे आकर्षण असले तरी भजन गाणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या देखील लक्षणीय असल्याने भजनाकडे तरुणांचा ओढा दिसून येतो याचा प्रत्यय ठाणे महापौर चषक भजन स्पर्धेत दिसून आला. या स्पर्धेत ज्येष्ठांसह तरुण आणि लहान मुलेही सहभागी झाली असून तरुण मंडळीच भजनाची परंपरा पुढे सुरू ठेवतील यात शंका नाही. धर्मवीर आनंद दिघे यांनी भजन संस्कृती रुजविली असून ती पुढेही अशीच सुरू राहिल असं महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितलं. ठाणे महापौर चषक भजन स्पर्धेचं आयोजन आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त आर्य क्रीडा मंडळ येथे करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत एकूण 20 भजनी मंडळे सहभागी झाली होती. अत्यंत तालबद्ध झालेल्या या स्पर्धेत सूरताल भजनी मंडळास 15 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक, नादब्रह्म भजनी मंडळास 10 हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक तर संतकृपा भजनी मंडळ आणि गांगोरामेश्वर प्रासादिक भजन मंडळाला 5 हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये कल्पेश शिंगोळे यांना उत्कृष्ट पखवाजवादक, सिध्देश चव्हाण-उत्कृष्ट झांजवादक, सर्वेश पांचाळ- उत्कृष्ट तबलावादक, भूषण देशमुख यांना उत्कृष्ट गायन तर मकरंद तुळसकर यांना उत्कृष्ट हार्मोनियम वादक म्हणून 5 हजार रुपयांचे पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading