रिबीन बॉल, क्रॉसफिट बार, बॅलन्स बीम, वॉलट आदीचा वापर करत स्पर्धकांनी सादर केलेल्या नेत्रदीपक अशा प्रात्यक्षिकांनी ठाणे महापौर चषक जिम्नॅस्टीक स्पर्धेला प्रारंभ झाला. ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा जिम्नॅस्टीक असोसिएशनच्या संयुक्त विद्यमानं आर्य क्रीडा मंडळ आणि सरस्वती सेकंडरी स्कूल येथे या स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत एकूण २५२ स्पर्धकांचा सहभाग आहे. काल सकाळी आर्टीस्टीक आणि रिदमिक जिम्नॅस्टीक या प्रकारातील चित्तथरारक अशी प्रात्यक्षिकं स्पर्धकांनी सादर केली.