ठाणे महापालिकेनं महापालिका क्षेत्रातील मोबाईल टॉवरची नोंद करून घ्यावी म्हणजे महसुलात वाढ होईल – राजीव दत्ता

ठाणे महापालिकेनं महापालिका क्षेत्रातील मोबाईल टॉवरची नोंद करून घ्यावी म्हणजे महसुलात वाढ होईल अशी मागणी राजीव दत्ता यांनी केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील एकही मोबाईल टॉवरची पालिकेकडे नोंद का नाही. अनेक वर्षांपासून एक रुपया कर वसुली करण्यात आलेली नाही का ? ही कर वसुली  करण्याबाबत अलीकडेच उच्च न्यायालयाने निर्णय पारित केले होते. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाबाबत अपील केली होती, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्णयाला कायम ठेवले आहे. अशा स्थितीत ठाणे महापालिकेने तातडीने मोबाईल टावर ची गणना करून कर वसुली करणे कर्मपात्र ठरत आहे. तसे केल्याने महापालिकेच्या तिजोरीत आर्थिक वाढ मोठ्या प्रमाणात होईल. तसेच ज्या अनाधिकृत बेकायदेशीर इमारतींवर दूरसंचार टॉवर उभारण्यात आले आहेत अशा इमारतींचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करून महापालिकेने तात्काळ दूरसंचार टावर या इमारतींवर ठेवावेत की काढावेत हा निर्णय देखील घेणे महत्त्वाचे आहे . जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी महापालिकेने हे निर्णय तातडीने घेणे क्रमपात्र ठरत आहे. असं राजीव दत्ता यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading