कोरोना काळात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कंत्राटी नर्सेस यांना पुन्हा आरोग्य सेवेत कायम करण्यासाठी आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या वतीने ठाण्याच्या जिल्हा अधिकारी कार्यालयाबाहेर जिल्ह्यातील आरोग्य केंद्र सेवेत रुजू करून घ्यावे यासाठी आंदोलन केले. यावेळी आयटक युनियनच्या वतीने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. तसेच आयटक कंत्राटी नर्सेस या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.