अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध नाट्यकर्मी प्रशांत दामले यांची निवड

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध नाट्यकर्मी प्रशांत दामले यांची आज निवड झाली. दामले यांची ही निवड पाच वर्षांसाठी आहे. एप्रिल महिन्यात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. यामध्ये प्रशांत दामलेंच्या रंगकर्मी नाटक समूह पॅनलचा दणदणीत विजय झाला. तर नवनाथ कांबळी (प्रसाद कांबळी) यांचे आपलं पॅनल पराभूत झालं. सध्या देशभर सर्वच क्षेत्रात होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपाची झलक यावेळी मराठी नाट्य परिषदेच्या निवडणूकीतही दिसून आली. प्रशांत दामले यांच्या मागे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शरद पवार होते, तर प्रसाद कांबळी यांना आशीष शेलारांकडून पाठबळ होते. रंगकर्मी नाटक समूहाकडून प्रशांत दामले, विजय केंकरे, विजय गोखले, सयाजी शिंदे , सुशांत शेलार, अजित भुरे, सविता मालपेकर , वैजयंती आपटे भरघोस मतांनी विजयी झाले. त्यानंतर आज झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारी समिती निवडणूकीत प्रशांत दामले यांनी अध्यक्षपदी बाजी मारली. या निवडणुकीत प्रशांत दामले यांना ६० पैकी ५० मतं मिळाली. प्रशासन उपाध्यक्षपदी नरेश गडेकर, उपक्रम उपाध्यक्षपदी भाऊसाहेब भोईर यांची बिनविरोध निवड झाली आहे तर कोषाध्यक्षपदी सतीश लोटके यांची निवड झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading