ठाणे महापालिकेमध्ये वृक्षाधिकारी पदावर सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिका-याची नियुक्ती करावी असे आदेश राज्य शासनानं महापालिका आयुक्तांना दिले आहेत. ठाणे महापालिकेच्या वृक्षाधिकारी पदावर सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी असावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महेश कदम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेतून वृक्षाधिकारी पदावर सहाय्यक आयुक्त पदाचा अधिकारी नेमण्याचे निर्देश न्यायालयानं शासनाला दिले होते. त्यानुसार शासनानं वृक्षाधिकारी पदावर सहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी नेमण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. महापालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त दर्जाचे ५ अधिकारी असून यातून एका अधिका-याची नियुक्ती वृक्षाधिकारी पदावर करावी असं शासनानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.