जिल्हा कोषागार कार्यालयाचे कामकाज गतीमान

आधुनिकीकरण आणि संगणकामुळे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या कामाचे स्वरूप बदललं असून ते अधिक गतीमान झालं आहे असे कौतुकोद्गार जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी काढले. राज्य शासनातर्फे दरवर्षी कोषागार दिन पाळला जातो. या कोषागार दिनाच्या निमित्तानं कोषागार कार्यालयास जिल्हाधिका-यांनी भेट दिली त्यावेळी त्यांनी हे गौरवोद्गार काढले. यावेळी देयकांचे प्रदान, कोषागार आणि विविध कार्यालयांमधील समन्वय या विषयावर त्यांनी चर्चा केली. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयाच्या मार्च महिन्यातील देयकांचे वित्त विभागाच्या निर्देशानुसार योग्य नियोजन करण्याकरिता एका परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं. शासकीय अनुदान योग्यरित्या विनियोग करून देयकं वेळेवर पारीत करण्यासाठी आवश्यक कार्यपध्दतीबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आलं. जिल्हा कोषागार अधिकारी राजेश भोईर यांनी आहरण, संवितरण अधिका-यांनी घ्यायची दक्षता, नियम आणि देयके विहित मुदतीत सादर करताना आवश्यक बाबी तसंच बदलत गेलेलं कामाचं स्वरूप याबाबत सविस्तर माहिती दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading