ठाणे महापालिकेतील ६६ नगरसेवकांचं एकनाथ शिंदे यांना समर्थन

ठाणे महापालिकेचे सर्व शिवसेना नगरसेवक एक गठ्ठा एकनाथ शिंदे यांच्या मागे उभे राहिले असून या सर्व नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवला आहे. ठाणे महापालिकेतील ६६ नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी महापौर नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळं ठाण्यामध्ये मूळ शिवसेना संपल्यातच जमा आहे. आज माजी महापौर नरेश म्हस्के आणि नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ रिक्षातून मोर्चा काढला होता. दोन दिवसापूर्वीच शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर रिक्षावाला म्हणून हीन टिका केली होती. त्याला शिंदे यांनीही जोरकस उत्तर दिलं होतं. आज शिवसेनेच्या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दर्शवल्यानंतर ठाण्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ रिक्षातून मोर्चा काढला होता.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading