ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गासाठी सोडत

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गासाठी सोडत काढण्यात आली. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात ही सोडत काढण्यात आली. नागरिकांचा मागास वर्ग पुरूष, नागरिकांचा मागास वर्ग महिला आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता ही सोडत काढण्यात आली. न्यायालयानं नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षण लागू करण्यास मंजुरी दिली होती. त्यामुळे या प्रवर्गासाठी आरक्षण निश्चितीकरता ही सोडत काढण्यात आली.

सोडतीचा विभागवार तपशील –

सोडत पीडीएफ-1

 

 

ठाणे महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. त्यात नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला ( ७ जागा), नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ( ८ जागा), आणि सर्वसाधारण महिला ( २२) जागांसाठी आज सोडत पूर्ण झाली.

नागरिकांचा मागास प्रवर्गातील जागा आणि महिलांच्या सुधारित जागा यांच्यासाठी आज सोडत काढण्यात आली. प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांच्या उपस्थितीत महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या हस्ते ही आरक्षण सोडत काढण्यात आली. त्याचे संचालन उपायुक्त मारुती खोडके यांनी केले.

ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२२ करीता जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या १८,४१,४८८ इतकी असून, त्यामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या १,२६,००३, अनुसूचित जमाती ४२,६९८ इतकी, नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केल्यानुसार एकूण १४२ जागांच्या १०.४ टक्केवारीनुसार एकूण १५ जागा निश्चित करुन देण्यात आलेल्या आहेत.

या निवडणुकीकरीता तीन सदस्यीय प्रभाग असे एकूण ४६ प्रभाग व चार सदस्यांचा १ असे एकूण ४७ प्रभाग अंतिम प्रभाग रचनेमध्ये प्रसिध्द करण्यात आले आहेत.

आरक्षण सोडत प्रकिया पूर्ण – डॉ. विपिन शर्मा

निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला प्रवर्ग यांची आरक्षण सोडत आज महापालिकेच्या शाळांमधील मुलांच्या हस्ते काढण्यात आली. आता आरक्षण निश्चितीचे काम पूर्ण झाले असून निवडणुकीच्या पुढील प्रक्रियेसाठी महापालिका प्रशासन पूर्णतः सज्ज आहे, असे प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सांगितले.

*
तक्ता १

१. नागरिकांचा मागास प्रवर्ग – ०७ जागा

१६ अ, १७ अ, २० अ, २६ अ, २८ अ, ३२ अ, ४७ अ

२. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – ०८ जागा

२ अ, ४ अ, ७ अ, १४ अ, १९ अ, ४२ अ, ४३ अ, ४६ अ

३. सर्वसाधारण महिला जागा – ५६ जागा

प्रभाग १ अ, 1ब, २ ब, 4 ब, 5 ब, 6 ब, 7 ब, 8अ, 8ब, 9 अ, 9 ब, 10 ब, 11 अ, 11 ब, 12 ब, 13 अ, १३ ब, 14 ब, 15 ब, 16 ब, 17 ब, 18 अ, 20 ब, 21 अ, 21 ब, 22 अ, 22 ब, 24 ब, 25 अ, 25 ब, 26 ब, 27 ब, 28 ब, 30 अ, 31 अ, 31 ब, 32 ब, 33 अ, 34 ब, 35 अ, 35 ब, 36 अ, 37 अ, 38 अ, 38 ब, 39 अ, 40 अ, 40 ब, 41 अ, 41 ब, 42 ब, 43 ब, 45 अ, 45 ब, 46 आणि ४७ ब

*

तक्ता २

ठाणे महापालिका एकूण जागा – १४२

१. सर्वसाधारण खुला प्रवर्ग – ५८
२. सर्वसाधारण खुला प्रवर्ग (महिला) – ५६
३. नागरिकांचा मागास प्रवर्ग – ०७
४. नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – ०८
५. अनुसुचित जाती – ०५
६. अनुसुचित जाती (महिला) – ०५
७. अनुसुचित जमाती – ०१
८. अनुसुचित जमाती (महिला) – ०२.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading