ठाणे महापालिकेच्या सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी महापालिकेबाहेर थाळीनाद आंदोलन केलं. महाराष्ट्र म्युनिसिपल कामगार युनियनच्या वतीने ठाणे महापालिका मुख्यालयावर सफाई आणि घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी थाळीनाद मोर्चा काढण्यात आला. कामगारांची 2017 पासूनची वेतनाची थकीत रक्कम अदा करावी आणि कामगारांना किमान वेतन मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी ठाणे महापालिकेविरोधात थाळी वाजवून निदर्शने करण्यात आली.