बेडेकर विद्यामंदिरमध्ये गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन

ठाण्यातील बेडेकर विद्यामंदिरमध्ये गणेश मूर्ती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. पर्यावरण दक्षता मंचाच्या सहर्याने बेडेकर विद्यामंदिर येथे दरवर्षी शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याची कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येते. यावर्षी सुद्धा या उपक्रमांतर्गत अलिकडेच शाळेतील विद्यार्थ्यांनी गणपतीच्या आकर्षक मूर्ती तयार केल्यात. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी आपल्या घरी गणेशोत्सवामध्ये या मूर्तींची प्रतिष्ठापना करणार आहेत. अशा उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या संवर्धनाची जागरूकता आणि आपल्या जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यात येते असं सांगण्यात आलं.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading