ठाण्यामध्ये सर्वात मोठ्या घरगुती श्रीगणपती सजावट स्पर्धेचं आयोजन

ठाण्यामध्ये सर्वात मोठ्या घरगुती श्रीगणपती सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत ओवळा-माजिवडा क्षेत्रात ९ लाखांची बक्षिसं दिली जाणार आहेत. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे ७५ शाखाप्रमुख असून प्रत्येक शाखा प्रमुखाच्या कार्यक्षेत्रात या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १८ सप्टेंबर पर्यंत जवळच्या शिवसेना शाखेत नाव नोंदणी करता येईल. या घरगुती गणेश सजावट स्पर्धेत पहिलं बक्षिस ५ हजार, दुसरं ३ हजार, तिसरं २ हजार तर उत्तेजनार्थ १ हजारांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. प्रत्येक शाखा प्रमुखाच्या कार्यक्षेत्रात ११ हजारांची पारितोषिकं दिली जाणार आहेत. ही स्पर्धा फक्त ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघासाठीच आहे. अधिक माहितीसाठी २५४२ ७२१७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading