ठाणे महापालिकेच्या शौचालयाचे प्लास्टर पडल्याने दोन व्यक्तींना दुखापत

प्रताप टॉकीज येथील ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या दुस-या मजल्यावरील खोलीच्या छताचे प्लास्टर पडल्याने दोन व्यक्तींना दुखापत झाली आहे. आज सकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. खोपट येथे असलेल्या महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयाच्या दुस-या माळ्यावरील खोलीच्या छताचं प्लास्टर पडून हा अपघात झाला. ही माहिती कळताच महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचारी आणि महापालिकेच्या कर्मचा-यांनी तातडीनं धाव घेऊन मदतकार्य केलं. यामध्ये गौरी गायकवाड आणि शिखा कारतीया या दोन मुलींना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनास्थळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापन कक्षामार्फत धोकापट्टी बांधण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading