वाघबीळ ब्रीज येथे एक कंटेनर दिशादर्शक फलकावर आदळल्याने अपघात

घोडबंदर रस्त्यावरील वाघबीळ ब्रीज येथे एक कंटेनर दिशादर्शक फलकावर आदळल्याने अपघात झाला. सुदैवानं यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. आज सकाळी ६ च्या सुमारास वाघबीळ ब्रीज येथे कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्यावर असलेल्या दिशादर्शक फलकावर आदळून हा अपघात झाला. या घटनेची माहिती कळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि पोलीसांनी तातडीनं धाव घेऊन मदत केली. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. कंटेनरने दिशादर्शक पोलला धडक दिल्याने पोल खाली पडला होता. रस्त्यावरत पडलेला दिशादर्शक पोल हायड्रा मशीनच्या सहाय्याने एका बाजूला करण्यात आला असून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading