ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक १८ ची संरक्षण भिंत कोसळली

ठाणे महापालिकेच्या शाळा क्रमांक १८ ची संरक्षण भिंत आज सकाळी कोसळली. मात्र सुदैवानं यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. आज सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. महापालिकेची ज्ञानसाधना महाविद्यालयाजवळ असलेल्या शाळा क्रमांक १८ ची सुमारे ३५ फूट लांब आणि ८ फूट उंच संरक्षण भिंत पडली तर काही भाग धोकादायक स्थितीत आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, सार्वजनिक विभागाचे अभियंता यांनी जेसीबी वाहनासह घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. सुदैवानं यामध्ये कोणतीही दुखापत झाली नसून घटनास्थळी जेसीबी मशीनच्या सहाय्याने पडलेल्या भिंतीचे डेब्रिज बाजूला करण्याचे तसंच धोकादायक असलेली भिंत काढून घेण्याचे काम सुरू आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading