ठाणे महापालिकेच्या वतीनं भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे महापालिकेच्या वतीनं भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर भारतीय घटनेतील न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मूलतत्व समाज मनावर कोरली जावी यासाठी संविधानाच्या उद्देशिकेचं सामुहिक वाचन करण्यात आलं. भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून महापालिकेच्या नागरी दैनंदिनी २०२० चे महापौरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. महापालिकेच्या अधिपत्याखाली ठाणे आपत्ती प्रतिसाद दल आणि ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांनी २६ जुलै २०१९ रोजी बदलापूर-वांगणी रेल्वे स्थानका दरम्यान पूराच्या पाण्यात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या प्रवाशांची सुखरूप सुटका केल्याबद्दल महापालिकेच्या वतीनं त्यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading