ठाणे महापालिकेच्या वतीनं जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे महापालिकेच्या वतीनंही जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महापालिकेच्या विविध विभागांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या योग शिबीराला अधिकारी-कर्मचा-यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत योगाचे धडे गिरवले. क्रीडा विभागाच्या वतीनं दादोजी कोंडदेव क्रीडा संकुल, श्रीशरदचंद्र पवार मिनी क्रीडा संकुल, मौलाना अब्दुल कलाम आझाद क्रीडा संकुल अशा ठिकाणी योग शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. परिवहन सेवेच्या वतीनं निर्मलादेवी चिंतामणी दिघे सभागृहात परिवहन सेवेच्या अधिकारी-कर्मचा-यांना अंबिका योग कुटिर संस्थेतील योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रशिक्षण देण्यात आलं. परिवहन सेवेच्या अधिकारी-कर्मचा-यांसमवेत वाहक-चालकांनी देखील या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. महापालिकेच्या सर्व शाळांमध्येही योग शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबीरास महापालिका शाळातील विद्यार्थी-शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. योगाचे विविध प्रकार या शिबीरात करून दाखवण्यात आले. तसंच जागतिक योगदिनानिमित्त योग, त्याचे प्रकार, दैनंदिन आयुष्यात होणारे त्याचे फायदे यावरही मार्गदर्शन करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading