ठाणे महापालिकेच्या वतीनं ठाणे युथ आयकॉन स्पर्धेचं आयोजन

ठाणे महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीनं ठाणे शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ठाणे युथ आयकॉन या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी ही माहिती दिली. ठाणे महापालिकेच्या डीजी ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपला आवडता आयकॉन निवडण्याची संधी मिळणार आहे. महाविद्यालयातीन १९ ते २८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असून प्रत्येक महाविद्यालयातून ३ मुलं आणि ३ मुली यांचं नामाकंन केलं जाणार आहे. या नामांकन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्या त्या महाविद्यालयात मतदान घेऊन १ विद्यार्थी आणि १ विद्यार्थिनी यांची निवड केली जाणार आहे. त्यानंतर महाविद्यालयातील प्रत्येकी २ अशा एकूण ३० विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थी आणि १ विद्यार्थिनी यांची अंतिम ठाणे युथ आयकॉन म्हणून निवड केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना डीजी ठाणेच्या वतीनं पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार असून निवडलेले विद्यार्थी महाविद्यालयीन स्तरावर स्मार्ट ठाणे युथ आयकॉन म्हणून सहभागी होणार आहेत. तसंच यापुढील टप्प्यात ठाणे स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीनं मोबाईल शॉर्ट फिल्म महोत्सव आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमातील प्रोजेक्ट रिपोर्टसाठी मदत केली जाणार असल्याची माहिती समीर उन्हाळे यांनी यावेळी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading