ठाणे महापालिकेच्या बीएसयुपी योजनेतील इमारतीत सदनिकांचे टाळे तोडून अनधिकृत ताबा घेतल्याचा धक्कादायक प्रकार

ठाणे महापालिकेच्या बीएसयुपी योजनेतील इमारतीत सदनिकांचे टाळे तोडून अनधिकृत ताबा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानं खळबळ उडाली आहे. शहरातील रस्ता रूंदीकरण तसंच विविध प्रकल्पांमध्ये कायमस्वरूपी विस्थापित झालेल्या कुटुंबियांना बीएसयुपी योजनेअंतर्गत सदनिकांचे वाटप महापालिकेतर्फे केले जाते. बीएसयुपीच्या इमारती घोडबंदर रस्त्यावरील तुळशीधाम, धर्मवीरनगर येथे आहेत. त्या घरांमध्ये काही रहिवासी अनधिकृतपणे राहत असल्याची माहिती महापालिका आयुक्तांना मिळाली होती. त्यानुसार इमारतीमधील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. एका रहिवाशानं केलेल्या तक्रारीवरून स्थावर मालमत्ता विभागाच्या कर्मचा-यांनी बीएसयुपी इमारत क्रमांक बी टू ची पाहणी केली असता काही सदनिकांमध्ये अनधिकृत वास्तव्य केलेली कुटुंबं आढळली. पालिकेच्या पथकाला या घुसखोरांनी कागदपत्रंही दाखवली. मात्र ही कागदपत्रं बनावट असल्याचं आढळलं. या कागदपत्रांवर मालमत्ता विभागाचे अधिक्षक महेश अहेर यांच्या बनावट स्वाक्ष-या होत्या. रवि, महाडीक, दिगंबर आगिवले, लता शिंदे आणि सोनाली रसाळ या ५ जणांविरूध्द चितळसर पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी रवि आणि महाडिक यांनी या रहिवाशांकडून ८० हजार रूपये घेऊन ही कागदपत्रं दिल्याचं उघड झालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading