ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप माळवी यांची नियुक्ती झाली आहे. ठाणे महापालिकेत संदीप माळवी हे सध्या उपायुक्त आहेत. त्यांची पदोन्नतीवर ही नियुक्ती झाली आहे. महापालिकेनं शासनाकडे माळवी यांची अतिरिक्त आयुक्त पदासाठी शिफारस केली होती. शासनानं त्याला मान्यता दिली आहे. संदीप माळवी हे महापालिकेमध्ये माहिती आणि जनसंपर्क विभागाचं उपायुक्त पद सांभाळत होते. त्याचबरोबर त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदा-याही देण्यात आल्या होत्या.