जैव वैद्यकीय कचरा निर्माण करणा-या आस्थापनांनी त्याची विहित मार्गाने विल्हेवाट लावणे गरजेचे – उपजिल्हाधिकारी

ठाण्यातील जैव वैद्यकीय कचरा निर्माण करणा-या आस्थापनांनी त्याची विहित मार्गाने विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिले आहेत. जैव वैद्यकीय कचरा अधिनियमाअंतर्गत एका बैठकीचं आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलं होतं. या बैठकीस महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डी. बी. पाटील, सरकारी रूग्णालयातील डॉक्टर्स, डॉक्टर असोसिएशनचे प्रतिनिधी, जैव वैद्यकीय कच-याची विल्हेवाट लावणा-या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सर्व डॉक्टरांची एकत्रित बैठक घेऊन जैव वैद्यकीय कचरा अधिनियमांतर्गत अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन करण्याची सूचना उपजिल्हाधिका-यांनी केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading