ठाणे महापालिकेचा आज सादर झालेला अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर होण्यापूर्वीच फुटल्यामुळे काँग्रेसनही यावर आक्षेप नोंदवला. महापालिका आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत कॉंग्रेस शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी गोंधळ घातला. महापालिका आयुक्त अर्थसंकल्प विषयी पत्रकारांना माहिती देत असताना विक्रांत चव्हाण तिथे आले आणि त्यांनी अर्थसंकल्प फुटला कसा यावर आक्षेप घेतला आणि पालिका प्रशासन चोर आहे आणि इतर अधिकारी वर्गाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण विक्रांत चव्हाण आपल्या हक्यावर कायम होते. बराच वेळ हा गदारोळ सुरू असल्याचं पाहून आयुक्त पत्रकार परिषदेतून निघून गेले.एकंदरीतच महापालिका महापालिकेचा अर्थसंकल्प यंदा काही समितीला सादर होण्यापूर्वीच फुटल्यामुळे बराच गाजला.