ठाणे महापालिका मुख्यालयात महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आलेत्यानंतर महापालिकेतील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस महापौर नरेश म्हस्के, आयुक्त बिपीन शर्मा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौरांना महापालिकेच्या सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर महापौरांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थित अधिकारी, नगरसेवकांचं स्वागत केलं.