ठाण्यातील सुप्रसिध्द अशा विद्या प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयामध्ये आज ध्वजारोहण करण्यात आलं. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या हस्ते हे ध्वजारोहण करण्यात आलं. विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर आर्टस् आणि वाणिज्य महाविद्यालय, बांदोडकर विज्ञान महाविद्यालय, तंत्रनिकेतन तसंच व्ही. एन. बेडेकर मॅनेजमेंट इन्स्टीट्यूट अशा सर्व संस्थांचं एकत्रित ध्वजारोहण करण्यात आलं. या ध्वजारोहण कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.