ठाणे महापालिका क्षेत्रात रात्री साडेदहा पर्यंत ८ हजार ४२८ गौरी-गणपतींचं जल्लोषात, वाजत गाजत विसर्जन

ठाणे महापालिका क्षेत्रात आज रात्री साडेदहा पर्यंत ८ हजार ४२८ गौरी-गणपतींचं जल्लोषात, वाजत गाजत विसर्जन झालं. यामध्ये ७ हजार ५९२ घरगुती गणेश मूर्ती तर १७ सार्वजनिक, ६१ स्वीकृत गणेशमूर्ती तर ७५८ गौरींचं विसर्जन करण्यात आलं. महापालिकेने केलेल्या कृत्रिम तलावात दत्तमंदिर घाट येथे ८१० घरगुती गणपती तर ६५ गौरींचं विसर्जन झालं. अहिल्यादेवी घाट येथे ३७८ तर ४६ गौरी, खारेगाव तलाव येथे ४१० घरगुती गणपती, १ सार्वजनिक गणपती तर ३३ गौरी, मिठबंदर घाट येथे ३७५ घरगुती गणपती तर १५२ गौरी, आंबेघोसाळे तलाव येथे ३०२ तर ५४ गौरी, रायलादेवी घाट१ येथे ४२० घरगुती गणपती तर ४५ गौरी, घाट२ येथे ७४५ घरगुती गणपती तर ११५ गौरी, कोलशेत घाट येथे ४६६ घरगुती, ६ सार्वजनिक तर ४६ गौरी, रेवाळे तलाव येथे ३४५ घरगुती, ४ सार्वजनिक तर ७ गौरी, गायमुख घाट१ येथे १२७ घरगुती तर ४ गौरी, गायमुख घाट २ येथे २३ घरगुती तर गौरींचं विसर्जन, खिडकाळी तलाव येथे ९६ घरगुती तर ७ गौरी, दिवा-गणेश घाट येथे ७१५ घरगुती गणपती तर ४८ गौरी, पारसिक रेतीबंदर येथे ६०० घरगुती, सार्वजनिक, ६१ स्वीकृत तर ३७ गौरी, आत्माराम घाट येथे ६९ घरगुती तर २ गौरी, शंकर मंदिर तलाव १२४ घरगुती गणपती तर १६ गौरी, निळकंठ वूडस् ३४८ घरगुती आणि १७ गौरी, तर उपवन तलाव येथे १२३९ घरगुती, ४ सार्वजनिक तर ६० गौरींचं विसर्जन करण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading