जिल्ह्यात कोरोनाचे ११९ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे ११९ नवे रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यात १ हजार ८६१ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९४७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ४० रूग्ण आढळले. सध्या ६९३ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १५४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १६ रूग्ण आढळले. सध्या १७७ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९६० रूग्ण दगावले आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ५२ नवे रूग्ण आढळले. सध्या ६९८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५४ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ५ रूग्ण आढळले. तर एकाचा मृत्यू झाला. सध्या ७७ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ४०५ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ३ रूग्ण तर सध्या १०२ रूग्ण उपचारार्थ दाखल आहे. आत्तापर्यंत ६६३ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज १ रूग्ण, सध्या १४ रूग्ण उपचार घेत आहे. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ० रूग्ण तर ३७ रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २ रूग्ण आढळले. सध्या ६३ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading