ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज आणि पोस्टर्सवर पालिकेची कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बॅनर्स, होर्डींग्ज आणि पोस्टर्सवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर काल शहरातील ८३ हातगाड्या, ८२ बॅनर्स, पानटप-या, चायनीज गाड्यांवर कारवाई करण्यात आली. पदपथावरील अतिक्रमण, अनधिकृत बॅनर्स आणि पोस्टरवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रभाग समितीमध्ये धडक कारवाई करण्यात आली. पुढील तीन दिवस ही विशेष मोहिम राबवली जाणार आहे. या कारवाई अंतर्गत वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रात ५२ हातगाड्या, २० बॅनर्स, ३ अनधिकृत बांधकामं, दिवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात ७ हातगाड्या, २० बॅनर्स, माजिवडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात ४ प्लास्टीक शेड, २१ फेरीवाले, ११ हातगाड्या, १ ज्यूस मशिन, २ लोखंडी टप-या, ४ पोस्टर्स, २ बॅनर्स तर वर्तकनगर प्रभाग समिती कार्यक्षेत्रात ३५ फेरीवाले आणि ५ हातगाड्या निष्कासित करण्यात आल्या. मुंब्रा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात ४० बॅनर्स, ८ हातगाड्या, ८६ लाकडी बाकडी, २७ लोखंडी स्टँड, ८ ऊसगाड्या, २३ पान टप-या, ६ चायनीज गाड्या आणि १७९ वेदरशेडस् तोडण्यात आल्या. शरद मोरे यांचे ५ पक्के गाळे जमिनदोस्त करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading