अभियांत्रिकी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनियर्स संस्थेचा पुरस्कार ठाण्याच्या इपिकॉन कन्सल्टन्सी सर्व्हीसेसला

अभियांत्रिकी क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनियर्स या संस्थेचा पुरस्कार ठाण्याच्या इपिकॉन कन्सल्टन्सी सर्व्हीसेसला प्राप्त झाला आहे. इपिकॉन कन्सल्टन्सी ही कंपनी गृहनिर्माण संस्था, सार्वजनिक प्रकल्प यांच्या बांधकामांच्या विशेषत: स्ट्रक्चर आणि स्लॅबची गुणवत्ता राखली जाते की नाही हे तपासते. या क्षेत्रात इपिकॉन कन्सल्टन्सीचं नाव अत्यंत आदरानं घेतलं जातं. कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करता अत्यंत व्यावसायिकपणे आणि कौशल्यपूर्ण काम सातत्यानं करत असल्याबद्दल तसंच हे करत असताना आपली सामाजिक दायित्वाबद्दलची जबाबदारीही पार पाडते, यासाठी हे मानाचं पारितोषिक इपिकॉन कन्सल्टन्सीला देण्यात आलं. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार इपिकॉन कन्सल्टन्सीचे संचालक जयंत कुलकर्णी, अरविंद परूळेकर यांनी स्वीकारला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading