ठाणे महापालिका कार्यालयात अभ्यागतांना प्रवेशबंदी

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिकेनं काही मार्गदर्शक तत्वं जारी केली असून महापालिका मुख्यालय तसंच प्रभाग समितीमध्ये येणा-या अभ्यागतांना पुढील आदेश होईपर्यंत प्रवेश बंदी केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनानं काही उपाययोजना केली असून त्यानुसार महापालिकेनं मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. यामध्ये गर्दी टाळण्यासाठी महापालिका मुख्यालय आणि प्रभाग समितीमध्ये अभ्यागतांना बंदी करण्यात आली आहे. ठाणेकरांनी महापालिकेशी संबंधित कामं करण्यासाठी संकेतस्थळाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. या संकेतस्थळाच्या ईमेलवरून तक्रारी अथवा अर्ज करता येणार आहेत. महापालिकेचं दैनंदिन टपाल आणि इतर महत्वाच्या कामासाठी येणा-या कर्मचा-यांच्या सोयीसाठी प्रत्येक विभागानं प्रवेशद्वारावच टपाल स्वीकारण्याची व्यवस्था करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. महापालिकेतील बायोमेट्रीक हजेरी प्रणालीही बंद करण्यात आली आहे. कोणत्याही बैठका या महापालिकेबाहेर तसंच आवश्यकता असल्यासच आयोजित करण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. कर आणि अन्य देय रक्कमांसाठी डिजीटल प्रणालीचा वापर करण्याचं आवाहनही महापालिकेतर्फे करण्यात आलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading