ठाणे महापालिका कचऱयापासून वीजनिर्मिती करणार असून या प्रकल्पात इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कचऱ्याची विल्हेवाट

ठाणे महापालिका कचऱयापासून वीजनिर्मिती करणार असून या प्रकल्पात इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावणार आहे. ठाणे महापालिकेने प्रतिदिन 1200 मेट्रिक टन कचऱयापासून वीजनिर्मिती प्रकल्पास मान्यता दिली असून त्याबाबतचे आवश्यक ते प्राथमिक कामकाज पूर्ण झाले आहे, तसेच या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ना-हरकत दाखला व मंजूरी देखील प्राप्त झाली आहे. या प्रकल्पामध्ये सहभाग घेणाऱया कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीराभाइशदर, वसई, पनवेल, भिवंडी या महानगरपालिका व अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांना निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी त्यांच्या स्तरावर आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांच्या शहरातील कचऱयाची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यावेळी याबाबतचे सादरीकरण करण्यात आले असून या प्रकल्पासाठी महापालिकांनी देखील तयारी दर्शविली असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. ज्या प्रमाणात महानगरपालिका, नगरपालिका यांचा या प्रकल्पामध्ये घनकचरा प्राप्त होईल त्या त्या प्रमाणात त्यांनी त्यासाठी येणारा खर्च उचलावा असा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading