ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे नवी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर प्रशिक्षणासाठी मसुरी येथे गेले असल्यानं सामान्य प्रशासन विभागानं १३ जानेवारीपर्यंत नवी मुंबई महापालिका आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार अभिजीत बांगर यांच्याकडे सोपवला आहे.