ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची बदली झाली आहे. आता त्यांची नियुक्ती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी वेलरासू यांच्या जागी त्यांची नियुक्ती झाली आहे. या नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा असे सामान्य प्रशासन विभागाकडून कळवण्यात आले आहे.