ठाणे महानगरपालिकेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्य सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे ठाणे महापालिकेचा सत्कार

राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल राज्य सरकारच्या पर्यावरण विभागातर्फे ठाणे महापालिकेचा सत्कार करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे जागतिक ओझोन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रधान सचिव प्रवीण दराडे, महानगर आयुक्त संजय मुखर्जी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे यांच्या हस्ते ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी हा सत्कार स्वीकारला. त्यावेळी, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त अनघा कदम, स्वच्छ वायू कार्यक्रम समन्वय अधिकारी तथा मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान, उप पर्यावरण अधिकारी विद्या सावंत या उपस्थित होत्या.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading