ठाणे महापालिकेचा ४० वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि संजय हेरवाडे यांच्या हस्ते महापालिकेच्या ध्वजाचे आरोहण झाले. त्यानंतर अग्निशमन दल, सुरक्षा दल, टीडीआरएफ, एमएसएस यांनी संचलन केले. ध्वजारोहण आणि संचलनानंतर नेत्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याचप्रमाणे, वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील थोर नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.