अशोक शिनगारे यांनी स्वीकारला ठाणे जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार अशोक शिनगारे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडून स्वीकारला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची बदली नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून झाली आहे. त्यांच्या जागेवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिनगारे यांनी काल ठाणे जिल्हाधिकारी पदाचा पदभार राजेश नार्वेकर यांच्या कडून स्वीकारला. शिनगारे हे २००९च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक या पदावर काम केले आहे. ९ सप्टेंबर २०२० पासून ते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव म्हणून काम पाहत होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading