ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीत विद्याधर ठाणेकर गटाचा विजय

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या काल झालेल्या निवडणुकीत विद्याधर ठाणेकर विजयी झाले आहेत. ठाणेकर यांच्याविरोधात निवडणूक लढवत असलेल्या अरूण करमरकर यांचा पराभव झाला आहे. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अवघ्या १९३ सभासदांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या निवडणुकीत विद्याधर ठाणेकर आणि विद्याधर वालावलकर या दोन गटामध्ये सामना झाला. ठाणेकरांच्या गटातून ते स्वत: निवडून आले आहेत. तर कार्यकारी मंडळासाठी त्यांच्या गटातील विनायक गोखले, वृषाली राजे, केदार बापट, कृष्णकुमार कोळी, निर्मोही फडके, नरेंद्र जोशी, निशिकांत महांकाळ तर वालावलकर गटातून सीमा दामले, डॉ. अश्विनी बापट, संजीव फडके आणि सुजय पत्की हे निवडून आले आहेत. म्हणजे ठाणेकर यांच्या गटातून ८ पैकी ७ तर वालावलकर यांच्या गटातून ६ पैकी ४ निवडून आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading