जिल्हा नियोजन विकास निधीतून जिल्हा कोषागार कार्यालयाला कॉम्पॅक्टर्स

जिल्हा नियोजन विकास निधीतून जिल्हा कोषागार कार्यालयाला देण्यात आलेल्या कॉम्पॅक्टर्सचे उद्घाटन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते झालं. या कॉम्पॅक्टर्सच्या माध्यमातून कोषागार कार्यालयातील अभिलेख जतनाचे काम सुलभ आणि सुरक्षित होतानाच संदर्भासाठी अभिलेख तातडीने मिळण्यास मदत होणार असल्याचे जिल्हाधिका-यांनी सांगितले. जिल्हा नियोजन विकास निधीतून कोषागार कार्यालायाला दोन कॉम्पॅक्टर्सचा संच देण्यात आला असून त्याद्वारे जिल्ह्यातील सुमारे 45 हजार निवृत्ती वेतनधारकांचे अभिलेख जतन करण्यास मदत होणार आहे. स्ट्रॉंगरुमध्ये बसविण्यात आलेल्या कॉम्पॅक्टर्समुळे मुद्रांकांचे जतन सुलभ पद्धतीने होण्यास मदत होईल. कोषागार कार्यालयात मोठ्या प्रमाणावर शासकीय दस्तावेज जमा होत असतो त्यामुळे अशाप्रकारच्या कॉम्पॅक्टर्समुळे हे सर्व दस्तावेज सुरूक्षित ठेवण्यास मदत होणार असल्याचं जिल्हा कोषागार अधिकारी भोईर यांनी सागितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading