ठाणे बंदला संमिश्र प्रतिसाद

हिंदू संत महात्म्यांच्या विरोधात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या टीकाटिप्पणीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या ठाणे बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी हिंदू संत महात्मे आणि देव देवतांच्या विरोधात केलेल्या टीकेचे पडसाद गेले काही दिवस उमटत असून याच्या निषेधार्थ ठाण्यात आज बंदची हाक देण्यात आली होती. वारकरी संप्रदाया तर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला या बंदला बाळासाहेबांची शिवसेना भारतीय जनता पक्ष पक्षानेही पाठिंबा दिला होता. आज पहाटेपासूनच ठाण्यात या बंदच वातावरण जाणवत होता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजे महापालिकेची परिवहन व्यवस्था पूर्णतः बंद होती तर रिक्षा तुरळक सुरू होत्या. परिवहन सेवा बंद असल्यामुळे रेल्वे स्थानक परिसरात मोठी गर्दी दिसत होती. बस साठी रांगा लागलेल्या दिसत होत्या मात्र बस नसल्यामुळे जळतो पर्यायी मार्गानं आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्याच्या प्रयत्नात होता सकाळच्या सुमारास ठाण्यातील बहुतांश दुकान बंद होती. दुकान दुकान उघडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुकानदारांना शांतपणे दुकान बंद ठेवण्याचा आवाहन केलं जात होतं. दुकानांबरोबर उपहारगृहही बंद असल्यामुळे अनेकांचे खायचे हाल झाले जे चाकरमाने दुपारच्या सुमारास बाहेर खातात त्यांचेही चांगलेच हाल झाले दुपारनंतर हळूहळू हे दुकान सुरू झाली मात्र दुपारपर्यंत तरी सार्वजनिक वाहतूक सुरू झाली नव्हती संध्याकाळपूर्वी  सर्व दुकान पुन्हा पूर्ववत सुरू झाली त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading